लवकरच मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर एच.आय.व्ही. टेस्ट ची सुवूधा उपलब्ध होणार आहे. यासाठी मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटी (एमडेक्स) आणि वन रुपी क्लिनिक ह्यांच्यात प्राथमिक चर्चा सुरु आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबईकरांसाठी हि सेवा साधारणतः 1 डिसेंबर ( विश्व एड्स दिवस) पासून सुरु होवू शकते. विशेषज्ञांच्या मतानुसार ह्यामुळे एड्स च्या परीक्षणात गती येईल. ज्याचे सकारात्मक परिणाम लवकरच सामोर येतील. एमडेक्स च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि सरकारी दवाखान्यांमध्ये एच.आई.व्ही. चे परीक्षण निशुल्क केले जाते. तर प्रायव्हेट दवाखान्यात एका रुग्णाकडून 300 रुपये घेतले जातात. सध्या स्थितीला मुंबई मधील 58 शक्ती क्लिनिक मध्ये हे परीक्षण निशुल्क केले जाते. आता हि सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता यावी म्हणून वन रुपी क्लिनिक शी चर्चा चालू आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews